मुक्ताईनगरात ग्रामपंचायतीतील बोगस भरतीची होणार चौकशी

0

भुसावळ। मुक्ताईनगर ग्रामपंचायतीत झालेल्या बेकायदा झालेल्या भरतीची चौकशी करावी या मागणीसाठी सेनेने गेल्या चार दिवसांपासून छेडलेल्या उपोषणानंतरही प्रशासन जागे होत नसल्याने जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मुख्य कार्यकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना जाब विचारल्यानंतर प्रशासन तत्काळ हलले.

जिल्हा परीषदेच्या ग्रा.पं.विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे बेकायदा नोकर भरतीबाबत चौकशी करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे पत्रक उपोषणार्थीना पदाधिकार्‍यांनी दाखवल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. उपोषणकर्ते सुनील पाटील, राजेंद्र हिवराळे, प्रशांत टोंगे, संतोष माळी, बबलु वंजारी यांना लिंबू पाणी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, छोटू भोई आदी उपस्थित होते.