मुक्ताईनगर (गणेश वाघ)- तालुक्यातील सालबर्डी येथील नियोजित जागेवर राज्यातील पहिल्या अल्पसंख्यांक बांधवांसाठी असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे भूमिपूजन मोठ्या जल्लोषात आज दुपारी १.१० वाजता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. ८७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून हे महाविद्यालय साकारले जात आहे. तर १३. ३६ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाला आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, जी.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी राज्यमंत्री अमीर साहेब, जळगाव मनपा नगरसेवक भगत बालानी, बेलगंगा चेअरमन चित्रसेन पाटील, भुसावळ नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.