मुक्ताईनगरात तरुणाची गळफासने आत्महत्या

0

मुक्ताईनगर- शहरातील भोई वाड्यातील 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. अजय विजय सावळे (21) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सावळे यांच्या घराशेजारी राहणार्‍या गणेश मिस्तरी यांना अजयचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसताच त्यांनी मयताच्या आईला झोपेतून उठवून सांगितले. मुलाचा मृतदेह पाहताच आईने टाहो फोडला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात देवानंद लोखंडे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सादीक पटवे करीत आहेत.