भिकेची रक्कम ठेवली तहसीलदारांच्या खुर्चीवर
मुक्ताईनगर:- इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याच्या निषेधार्थ येथील काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने शहरातील प्रवर्तन चौक ते आठवडे बाजारादरम्यान रविवारी दुपारी भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते तर त्यातून जमा झालेली एक हजार 739 रुपयांची रक्कम तहसील प्रशासनाला देण्यासाठी सोमवारी पदाधिकार्यांनी तहसील कार्यालय दुपारी 12 वाजता गाठले मात्र पूर्व सूचना दिल्यावरही प्रभारी तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस उपस्थित नसल्याने तसेच तहसील कर्मचार्यांनीही ही रक्कम स्वीकारण्यास असमर्थता दर्शवल्याने काँग्रेस पदाधिकार्यांनी तहसील आवारात जोरदार निदर्शने केली व प्रशासनाचा कारभाराचा निषेध व्यक्त केला. तहसीलदारांच्या रीकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून भिकेतून जमा झालेली रक्कम खुर्चीवर ठेवण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान इस्माईल खान, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पाटील, बी.डी.गवई, डॉ.विष्णु रोटे, अॅड. अरविंद गोसावी, मारोती सुरडकर, शहराध्यक्ष आलम शहा, अतुल जावरे, पांडुरंग राठोड, अरुण कांडेलकर, अनिल सोनवणे, कुसूम पाटील, युवराज जाधव, हाजी युनूस खान, हिरासिंग चव्हाण, दादाराव पाटील, प्रा.सुभाष पाटील, रामभाऊ महाले, रघुनाथ पाटील, गुनाजी इंगळे, महेमूद शेख, मधुकर भगत, शाहरुख खान, रामराव पाटील, आर.के.गणेश, फिरोज शेख टेलर, आनंदा कोळी, महेश खुळे, मुकेश वाकोडे, शेख रमजान, बाबू पटेल, कासम ठेकेदार, सोनुसिंग पवार आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.