मुक्ताईनगर – येथे पोलिस वसाहतीत गटारी साठी खोदलेल्या पाच फुट पाण्याने भरलेल्या खड्यात पडलेल्या दोन लहान चिमुरड्याचा केदारे परिवाराचा सतर्कतेने प्राण वाचले. येथे पोलिस वसाहतीत बांधकाम विभागाचा हलगर्जी पणामुळे अपरे बांदकाम झालेल्या पाच फुट खोल पाण्याने भरलेल्या गटारीत अंगणवाडित शिकणारे दोन चिमुरडे पडले हे पोलिस वसाहतीत राहणार्या केदारे परिवाराचा सदस्याना दिसताच त्याचा सतर्कतेने त्या लहान मुलांना बाहेर काढुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले. बांधकाम विभागाशी वारंवार संपर्क करुन देखिल गटारी चे काम करण्यात येत नाही .अपुर्ण बांधकाम असल्याने पोलिस वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले असुन साथीचा रोगाची लागण होण्याची शक्यति आहे तसेच आज केदारे कुंटुबियांचा सतर्कतेने अनर्थ होताना टळला बांधकाम विभागा याकडे लक्ष देवुन गटारीचे बांधकाम पुर्ण करावे अशी मागणी होत आहे