मुक्ताईनगरात दोन प्रभागात फुलले कमळ : अपक्षाची मुसंडी

0

नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार नजमा तडवी आघाडीवर

मुक्ताईनगर- जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी शुक्रवार, 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग एक व दोनमध्ये भाजपा उमेदवार विजयी झाले असून प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी या आघाडीवर आहेत.

भाजपा उमेदवारांचा विजय
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग एकमध्ये बबलू कोळी हे भाजपा उमेदवार विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उमेदवार गणेश टोंगे यांचा पराभव केला तर प्रभाग दोनमध्ये भाजपा उमेदवार शबाना बी.आरीफ आझाद या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या शगुप्ता अख्तर खान यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवार नूसरतबी मेहबूद खान विजयी झाल्या. त्यांनी भाजपा उमेदवार रचना गजानन वंजारी व शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार विजया दीपक नाईक यांचा पराभव केला. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार नजमा तडवी आघाडीवर आहेत.