मुक्ताईनगरात धार्मिक भावना दुखापल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

0

मुक्ताईनगर- धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट फेसबुकवर टाकल्यामुळे मुक्ताईनगर येथील एकाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथील अफसर खान यांनी 22 डिसेंबर रोजी धार्मिक भावना दुखावतील, अशी पोस्ट फेसबुकवर टाकल्याने 24 डिसेंबरला मुक्ताईनगर बजरंग दल शहर संयोजक विजय पोलाखरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.