मुक्ताईनगरात नाथाभाऊंची सरशी : नगरपंचायतीच्या विजयानंतर वरणगावात जल्लोष

0

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत केला जल्लोष

वरणगाव- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत मतदारांनी भाजपाला एकहाती सत्ता दिल्यानंतर वरणगावातील स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. मुक्ताईनगरातील भाजपाच्या विजयामुळे खडसे समर्थकांचा उत्साह यआणखी दुणावला आहे . हे देखील तितकेच खरे असल्याने येथील कार्यकत्यांनी वरणगाव बसस्थानक चौकात भुसावळ तालुक्याचे माजी सभापती सुनील महाजन यांच्या हस्ते फटाक्यांची अतीषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. प्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेविका अरूणाबाई इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, गोलू पाटील, विलास पाटील, सुभाष वाघ, इफ्तेखार मिर्जा, गुड्डू बढे, महेश सोनवणे, कस्तूब पाटील, प्रफुल्ल फालक, शुभम जावळे, नरेंद्र माळी, भैया सोनवणे, स्वप्नील पाटील, प्रवीण पाटील आदी कार्यकत्यांनी जल्लोष केला.