मुक्ताईनगर- निष्क्रिय व खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारच्या निषेधार्थ तसेच शेतकरी व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार, 22 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात येणार आहे.
अशा आहेत मोर्चेकर्यांच्या मागण्या
कापसाला आठ हजार रुपये भाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करावी, एलपीजी गॅस सिलिंडरची झालेली दुप्पट दरवाढ कमी करावी, अनियमित वीजपुरवठा थांबवावा तसेच भारनियमन बंद करावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम सरसकट बागायतीप्रमाणे मिळावी, मुक्ताईनगर शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, मुक्ताईनगर नगरपंचायतीने शहरात स्वच्छता ठेवावी, केळी पीक विम्याची रक्कम मिळावी, कृषी पंपाचे वीज बिल माप करावे, धान्य खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काढण्यात येणार्या मोर्चात हजारोंच्या सख्येने सहभागी रहावे, असे आवहान जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, जिल्हा परीषदेचे माजी गटनेता विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, माजी सभापती आनंदराव देशमुख, कार्याध्यक्ष सोपान दुट्टे, शहराध्यक्ष अशोक नाईक, पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी, युवक जिल्हा सरचिटणीस पवनराजे पाटील, युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान आदींनी केले आहे.