मुक्ताईनगरात पेट्रोल व डिझेल दरवाढीचा अनोखा निषेध

0

वाहनधारकांचे गुलाबपुष्पाने स्वागत ; काँग्रेसच्या गांधीगिरीची शहरभर चर्चा

मुक्ताईनगर- पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला असताना तालुका काँग्रेसने गांधीगिरी करीत शहरातील महाजन पेट्रोल पंपावर आलेल्या चारचाकी व दुचाकीस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. काँग्रेसच्या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाची शुक्रवारी दिवसभर चर्चा राहिली.

यांची होती उपस्थिती
पेट्रोल दर वाढीसंदर्भात जिल्हा सरचिटणीस डॉजगदीश पाटील व काँग्रेस तालुकाअध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पाटील, जिल्हा सचिव आसीफ खान ईस्माईल खान, जिल्हा सचिव संजय पाटील, ज्येष्ठ नेते बी.डी.गवई, अ‍ॅड.अरविंद गोसावी, डॉ.विष्णू रोठे, निरज बोरखेडे, प्रा.सुभाष पाटील, प्रा.पवन खुरपडे, रवींद्र दांडगे, संजय धमोळे, पंडित काळे, अरुण कंडेलकर, दरबारसिंग पाटील, भूषण महाजन, अरुण मिस्तरी, संतोष मिस्तरी, दिनेश मुर्हेकर, चेतन सावळे, आसीफ मुलतानी, महेंद्र बोरसे, विष्णू रोढे, शालिग्राम भगत, विजय पारखे, अंबादास कांडेलकर, संजय विष्णू पाटील, आनंदा कोळी, निलेश पाटील, दीपक साबे, राजू पाटील, महेश खुळे, मंगेश कोळी, अनिल सोनवणे, पवन कंडेलकर, रईस शहा, विनायक कुलकर्णी, दीपक चौधरी, इम्रान शहा आदी उपस्थित होते.