नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
मुक्ताईनगर– नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2018 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. यासाठी येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी 17 प्रभागांच्या आरक्षणासाठी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार रचना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत काढण्यात आली. मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याअ ंतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये सोमवारी दुपारी 12 वाजता 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत लहान बालकांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील यांच्यात खडाजंगी होऊन काही काळ वातावरण तापले होते. प्रसंगी प्रांताधिकारी यांनी माफी मागावी या मागणीवर निवृत्ती पाटील ठाम होते परंतु माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी मध्यस्थी केली असता वादावर पडदा पडला. यामुळे सोडतीसाठी आलेले नागरिक संतप्त झालेले होते. त्यातील काही नागरिक परतून गेले होते.
प्रभागांसाठी जाहीर झालेले आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 – नामाप्र सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 3 – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 4 – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 5 – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 6 – अनुसूचीत जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 – अनुसूचीत जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 – अनुसूचीत जाती स्त्री, प्रभाग क्रमांक 9 – नामाप्र स्त्री, प्रभाग क्रमांक 10 – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 – नामाप्र सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 13 – नामाप्र स्त्री, प्रभाग क्रमांक 14 – सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक 15 – सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 – नामाप्र स्त्री, प्रभाग क्रमांक 17 – सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहेत.
दरम्यान मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी 17 प्रभागाकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली.