मुक्ताईनगरात प्राणहानी टळली ; वाहनाच्या धडकेने विजेचा खांब तुटला

0

मुक्ताईनगर- शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुटलेल्या ढाब्याजवळून वाहन काढण्याची कसरत करीत असताना वाहनाचा धक्का इलेक्ट्रीक पोलला लागून तो वीज वाहक तारेसह तुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने अप्रिय घटना टळली अन्यथा वीज वाहक तारेमुळे प्राणहानी होण्याची भीती होती. प्रभाग 12 मध्ये 407 वाहनाचा धक्का इलेक्ट्रीक पोलला लागून तो खाली कोसळल्याने काही घरांना धक्का लागला तर शेजारीच महिलांसह पुरूष रस्त्यालगत उभे होते तर लहान मुले खेळत होती मात्र सुदैवाने अप्रिय घटना टहली. हा प्रकार केवळ नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याने याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे मुख्याधिकारी व नगरपंचायत प्रशासनाची तक्रार करणार असल्याचेही प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक संतोष मराठे म्हणाले.