मुक्ताईनगरात बंद घर फोडले : 23 हजारांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ/जळगाव : मुक्ताईनगरात बंद घर फोडून चोरट्यांनी दुचाकीसह लॅपटॉप, होम थिएटर आणि रोकड मिळून 23 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडत असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा
दिलीप धनसिंग पाटील (48, रा.मुक्ताईनगर) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला असून सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. बंद घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, होम थिएटर, बाहेर लावलेली दुचाकी (एम.एच.19 ए.टी.2908) आणि रोकड मिळून 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याबाबत दिलीप पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार तुषार जावरे करीत आहे.