मुक्ताईनगर : नाफेड अंतर्गत मुक्ताईनगर तालुका शेतकीसह संघाद्वारे तहसीलच्या धान्य गोदामात भरडधान्य खरेदी केंद्राचा गुरुवारी 16 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तहसिलदार रचना पवार, नायब तहसिलदार शांताराम चौधरी, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रभाकर झोपे, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, उपसभापती प्रल्हाद जंगले उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विकास पाटील, माजी सभापती राजु माळी, सरपंच ललित महाजन, स्विय सहाय्यक योगेश कोलते, पुरुषोत्तम महाजन, नारायण चौधरी, सुनील काटे, चंद्रकांत भोलाणे, अश्विन कोळी, हरिष बोदडे आदी उपस्थित होते.