मुक्ताईनगरात भरदिवसा चोरट्यांचा 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला

मुक्ताईनगर : शहरातील सीडफार्ममधील रहिवासी शेख हकिम शेख रशीद चौधरी यांच्या घरातून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेले दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल व टेबलावर ठेवलेली 30 गॅ्रम वजनाची सोन्याची पोत मिळून 60 हजारांचा ऐवज लांबवला. गुरुवार, 17 मार्च रोजी सकाळी ही घटना घडली. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोट्यवधींचे

भरदिवसा झाली चोरी
गुरुवारी सकाळी 6.45 वाजता शेख हकिम शेख रशीद हे नगरपंचायतीच्या वाहनात कचरा टाकण्यासाठी बाहेर पडले असता त्याचवेळी चोरट्याने दोन मोबाईल तसेच टेबलावर 30 ग्रॅम वजनाची पोत लांबवली. घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात व्यक्ती पांढरा रंगाचा शर्ट व काळे रंगाची पँट घातलेला घरात ऐवज चोरी करण्यासाठी शिरताना दिसून आला आहे. मुक्ताईनगर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास हवालदार आसीम तडवी करीत आहे.