शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन
मुक्ताईनगर- लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणार्या भाजपा आमदार राम कदमांचे निलंबन करावे, अशी मागणी करीत वाचाळ आमदारावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक कल्पना पालवे, सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, सुनीता तळेले, उज्वला कुंभार, विद्या भालशंकर, शारदा भोई, ज्योती मालचे, भारती हिवराळे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरपंचायत गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, शहरसंघटक वसंत भलभले, युवासेना तालुका प्रमुख सचिन पाटील, युवासेना शहर प्रमुख पंकज राणे, संतोष माळी, दीपक खुळे, बबलु वंजारी आदींसह असंख्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.