मुक्ताईनगर- ज्ञानेश्वरी सप्ताहनिमित्त मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताबाई मंदिरावर आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने 19 भाविक जखमी झाल्याची घटना 10 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांचे अंगावरील मधमाशांचे काटे काढण्यात आले. जखमींची तब्बेत स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांनी सांगितले .सर्व जखमी लातुर, रायगड व ठाणे जिल्ह्यातील आहेत .
यांना घेतला मधमाशांनी चावा
जखमी भाविकांमध्ये नरेश धर्मा थवई (60, रा.ठाणे), उत्तम निवृत्ती वने (57, रा. कापरा), लक्ष्मी उत्तमराव बने (रा.कापरा, ता.जिल्हा लातूर), पंढरीनाथ दगा सूर्यवंशी (80, रा.ठाणे), जनार्दन शंकर शिराळे (67, रा.नांदेड), उषा सुधाकर स्वाती (45, रा.लातूर), शशिकांत नामदेव म्हात्रे (ठाणे), खोदराव उमाजी गोदराव (65, लातूर), देवशाला उमाजी गोदराव (60, लातूर), रामभाऊ किसन पवळ (54, रा. लातूर), मंगला रामकृष्ण बेभेरे (60, रा.लातुर), हरीबा सोपान दहीभात (65, लातूर), धोंडीराम किसन कदम (65, नांदेड), शोभा धोंडीराम कदम (52, नांदेड), मांकर्ना भुजंगराव धनुरे (55, नांदेड), भीमशंकर रुद्र स्वामी (65, लातूर), इंदूबाई जनार्दन शिराळे (65, लातूर), जनार्दन धर्मा धवाई (70, ठाणे), अन्नपपुरणा लक्ष्मण डोंबे (59, ठाणे) व श्रीराम तुकाराम सोनकर (39, रायगड) यांचा समावेश आहे. तब्बल तीन दशका पासून देशभर फिरता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह करणार्या रायगड, ठाणे लातूर येथील वारकरी बांधवांचा यंदा शिवछत्र मुक्ताई नगर येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह रविवारपासून सुरु झाला होता.