मुक्ताईनगरात वकिल संघातर्फे गीत गायन

0

मुक्ताईनगर। तालुका वकील संघातर्फे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून गोदावरी मंगल कार्यालयात मराठी हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख दिवाणी न्यायाधीश आर.एम. तुवर तर प्रमुख पाहुणे म्हणून सह दिवाणी न्यायाधीश आर.एस. मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुक्ताईनगर तालुक्यात प्रथमच अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका वकील संघातर्फे करण्यात आले होते.अतिशय सुंदर व सुरेल आवाजात वकीलबंधवावानी गीत गायन केले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका वकील संघ मुक्ताईनगरचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. इंगळे, अ‍ॅड. बाळा पाटील, सचिव अ‍ॅड. यु.आर. जवरे तसेच अ‍ॅड. गोसावी, अ‍ॅड. टावरी, अ‍ॅड. मनोहर खैरनार, अ‍ॅड. देविदास काळे, अ‍ॅड. तुषार पटेल, प्रवीण भोंबे, अनिल पाटील, महेश भोकरीकर, श्रीकृष्ण दुट्टे, विजय सोळुके, सचिन पाटील, किशोर पाटील, निरज पाटील, अनिल मोरे, भीमराव बांगर, ललित पुजारी, अरुण कांडेलकर अशा सर्व वकिल बांधवांनी परीश्रम घेतले.

महामानवांच्या कार्यावर प्रकाशझोत
यावेळी सुरुवातीला महामानवांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात देश भक्तीपर गीते व भिम गीतांची चांगलीच मैफिल रंगली होती. प्रास्ताविक अ‍ॅड. संतोष इंगळे यांनी केले. सुत्रसंचलन अ‍ॅड. विनोद इंगळे यांनी केले. तर आभार अ‍ॅड. अरविंद गोसावी यांनी मानले.