मुक्ताईनगर– शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी जुबेर खान फिरोज फिरोज खान (मुक्ताईनगर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत विद्यार्थिनीचा रस्ता अडवून तिला फोन नंबरची मागणी करीत शिवीगाळ व छेडखानी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.