मुक्ताईनगर। राज्यातील वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती करणारा रथ विदर्भातून मुक्ताईनगरात दाखल झाला. हा रथ जळगावकडे मार्गस्थ करताना माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यास हिरवी झेंडी दाखवली.
मुक्ताईनगर तालुक्यात ते जुलैदरम्यान कोटी वृक्ष लागवड होणार आहे. यासाठी हरित सेना सदस्य नोंदणीसाठी वनविभागातर्फे जनजागृती रॅलीला चंद्रपूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. ही रॅली बुलडाणा, मोताळा, मलकापूर मार्गे गुरुवारी मुक्ताईनगरात दाखल झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रॅलीचे स्वागत केले. प्रवर्तन चौकात आयोजित कार्यक्रमात तहसीलदार रचना पवार, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, राजू माळी, योगेश कोलते, पोलिस निरीक्षक अशोक कडलग, धनंजय सापधरे, विजय शूरपाटणे, सहायक उपवनसंरक्षक डी. आर. पाटील, आरएफओ पी.टी.वराडे, सामाजिक वनिकरण अधिकारी एम.डी.नेमाडे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, वनपाल डी.एम.कोळी, आर.एल.ठोसर आदी उपस्थित होते.