मुक्ताईनगर- जुन्या कोथळी मंदिरावर वॉटर पार्कचे काम सुरू असताना इलेक्ट्रीक तारांना स्पर्श झाल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. रेवाराम करणसिंग बर्डे (अंबा, ता.नेपानगर, जि.बर्हाणपूर, ह.मु.जुने कोथळी मंदिर, ता.मुक्ताईनगर) असे मृत मजुराचे नाव आहे. रेवाराम हा मजूर 10 फुटाच्या अॅल्युमिनिअमच्या पट्टीने लेव्हलिंग करीत असतानाच त्यास चक्कर आल्याने या पट्टीचा वीज तारांना स्पर्श झाल्याने तो बेशुद्ध झाला. मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात त्यास आणल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रकाश नरसिंग बर्डे याने मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विनोद श्रीनाथ करीत आहेत.