मुक्ताईनगरात शिवसेनेच्या घेराव आंदोलनानंतर नरमले प्रशासन

0

दोन दिवसात 150 शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे मिळणार रक्कम

मुक्ताईनगर- शेतकर्‍यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईची मंजूर रक्कम तत्काळ शेतकर्‍यांना अदा करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात घेराव आंदोलन मंगळवारी करण्यात आल्याने वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली. तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनात वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, स्टेट बँक मॅनेजर सचिन वानखेडे व पोलिस उपनिरीक्षक निलेश सोळुंके यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेतून शेतकर्‍यांच्या खात्यावर आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून दोन दिवसांनी 150 शेतकर्‍यांना धनादेश देण्यात येतील, असे लेखी आश्वासन वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर.बच्छाव यांनी दिल्याने शिवसेनेने घेराव आंदोलन थांबविले .

यांचा आंदोलनात सहभाग
प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, वसंत भलभले, जाफर अली, शकुर जमादार, पवन सोनवणे, शुभम शर्मा, शुभम तळेले, हरी माळी, अनिकेत भोई, गौरव काळे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.