इंधन दरवाढीचा निषेध ; प्रशासनाला निवेदन
मुक्ताईनगर:- वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हा होरपळत असून केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांमुळे व फसवी कर्जमाफी, सक्तीची वीज बिल वसुली मुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी मुक्ताईनगरात बुधवारी सकाळी 11.30 वाजता मुख्य प्रवर्तन चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वाधिक महिलांनी सहभाग नोंदवला. रास्ता रोकोमुळे प्रवर्तन चौकात अर्धा तासभर वाहतूक खोळंबल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
यांचा होता सहभाग
सेनेच्या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अॅड. मनोहर खैरणार, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख अफसर खान, युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, मुशीर मनियार, सुभाष माळी, बाळा भालशंकर, प्रवीण चौधरी, विनोद पाटील, प्रमोद इंगळे, अमोल कांडेलकर, अमरदीप पाटील, महेंद्र कोळी, वसंता भलभले, शुभम तळेले, डॉ. सुनील देवरे, शांताराम निंबोरे, नाना चौधरी, बंडू पोळ, वैभव तळेले तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.