मुक्ताईनगरात स्त्री मुक्ती परीषद

0
मुक्ताईनगर  : भारिप बहुजन महासंघातर्फे शहरात स्त्री मुक्ती परीषद झाली. प्रसंगी 14 ठरावांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या राजश्री ससाणे होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार होत्या. सरदार म्हणाल्या की, मनु कायद्यांतर्गत भारतीय स्त्री व क्षुद्र यांना गुलाम म्हणून वागवले जात होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले व खर्‍या अर्थाने या दिवशी महिलांना मुक्ती मिळाली.