मुक्ताईनगर : कोरोना काळात धान्य कपात न करण्याची सक्त ताकीद असल्यावरही लिंकच्या घोळामुळे दुसर्या जिल्ह्यात नावे लिंक झालेल्या रेशन लाभार्थींचे धान्य कपात केले जात आहेत तसेच केशरी कार्डच्या कागदपत्रांबाबत तहसीलदारांच्या सुचनेनंतर ही कागपत्रे जमा करून घेणे बंधनकारक असतांना नागरिक तथा वयोवृद्ध नागरीकांना ठरलेल्या वेळेत बोलावून पुन्हा हेटाळणी केली जाते याबाबत नागरीकांचा प्रचंड रोष वाढलेला असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा रेशन दुकानदारांचे मनसुबे उधळून लावत नागारीकांना उडवाउडवीची व अरेरावीची उत्तरे देणार्या सर्व दुकानांची सखोल चौकशी होत त्यांचे दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा आणि नव्याने शहरात 17 प्रभागात नागरीकांच्या सोयीनुसार 17 रेशन दुकानांची निर्मिती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक संतोष मराठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार शाम वाडकर व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांना दिले आहे.