सीएम चषक यशस्वी करा -माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे आवाहन
मुक्ताईनगर- भारतीय जनता युवा मोर्चा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक नुकतीच झाली. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शनात सी.एम. चषक यशस्वी करण्याचे आवाहन केले. प्रसंगी गुरुनाथ फाऊंडेशन मुक्ताईनगरतर्फे 25 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जुन्या मुक्ताई मंदिर परीसरात रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक युवतीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या मेळाव्यात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीयतसेच राष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून पात्र युवक-युवतींना याची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
मुक्ताईनगर भाजपा तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, नगरसेवक ललित महाजन, गटनेता पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, चंद्रकांत भोलाने, बापू ससाणे, संजय निकम, संजय कपले, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, भाजयुमो रावेर तालुकाध्यक्ष पवन चौधरी, भाजयुमो बोदवड तालुकाध्यक्ष विनोद चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.