मुक्ताईनगरात 25 रोजी बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

1

गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे आयोजन ; बेरोजगारांनी लाभ घेण्याचे खासदार रक्षा खडसेंचे आवाहन

भुसावळ- मुक्ताईनगर येथील गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे रविवार, 25 रोजी सकाळी नऊ वाजता संत मुक्ताई मंदिर, कोथळी येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करण्याची संधी बेरोजगार युवकांना मिळणार आहे. दहावी पास-नापास, बारावी पास-नापास, आयटीआय, डीप्लोमा, पदवीधर, उच्च पदवीधर, बी.ई., बी.टेक., एमबीए आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार खडसे यांनी केले आहे. या मेळाव्यात प्रतिष्ठीत 65 कंपन्या सहभागी होत असून कंपन्यांसोबत चांगली मुलाखत झाल्यास शंभर टक्के नोकरीची संधी मिळणार आहे.