गणितालाही चालली सर्रास कॉपी ; मुक्ताईनगरात मुख्याध्यापकाच्याच मुलाने केली कॉपी
जळगाव : कॉपीमुक्त अभियानाचा जिल्ह्याचा बोजवारा उडाला असताना सातत्याने कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. शनिवारीदेखील मुक्ताईनगर येथील तीन कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली तर चोपड्याच्या कस्तुरबा गांधी विद्यालयातील पाच कॉपी बहाद्दरांना डीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली.
मुक्ताईनगरात मुख्याध्यापकाच्या मुलावर कारवाई
मुक्ताईनगर शहरातील जे.ई.स्कूलमध्ये कॉपी करणार्या तीन विद्यार्थ्यांना डीबार करण्यात आले. दोन कॉपी बहाद्दर अल फलाह उर्दू शाळेचे विद्यार्थी असून त्यातील रोहन इक्बाल शाह हा याच शाळेचे मुख्याध्यापक इक्बाल शाह यांचा मुलगा आहे तर अन्य डीबार झालेला विद्यार्थी खडसे आश्रमशाळेचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई राज्य मंडळाच्या सदस्य प्रा.शुभांगी दिनेश राठी (भुसावळ) यांनी केली तर चोपडा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी कॉपी बहाद्दरांवर कारवाई केली.