मुक्ताईनगर। संत मुक्ताबाई समाधी स्थळ म्हणून पावन तिर्थक्षेत्र मुक्ताई नगरीत वारकरी मंडळी बाहेरगावाहून दररोज एकादशीच्या दिवशी पालख्या घेवून पायी प्रवास करीत श्रध्देने आदीशक्ति मुक्ताईच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी मंदिर मार्गावर उघड्याने मांसविक्रीची दुकाने पाहून भावना दुखावत असल्याने उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात वारकरी मंडळातर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
यात नमूद करण्यात आले आहेे की, कायद्यानुसार उघड्यावर मांसविक्री करण्यास बंदी असतांना यापुर्वी वेळोवेळी निवेदन देवून सुध्दा मुक्ताई नगरीत त्याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. तरी प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देवून उघड्यावर होणारी मांसविक्री बंद करण्याची मागणी वारकरी, कीर्तनकार व फडकरींतर्फे करण्यात आली आहे.