वरणगाव– शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बोकाळलेल्या अवैध धंदे बोकाळले असून याबाबत तक्रारी वाढल्यानंतर मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुभाष नेवे यांनी वरणगाव गाठत बसस्थानक चौकात मटका सुरू असतांना गोलू अनिल देशमुख (24 , काळबांडे वाडा), रवींद्र ऊर्फ दाढी चौधरी (35) यांच्या मुसक्या आवळलया. आरोपी रामपेठ भागातील दादाभाई यांच्या दुकानाच्या आडोशाला झन्ना-मन्ना कल्याण मटका जुगार खेळतांना आढळले. त्यांच्याकडून एक हजार 50 रुपये रोख व अन्य साहित्य जप्त करण्यात आले तसेच किरण अशोक पाटील (30, माळीवाडा) यास गुरुवारी सायकांळी सात वाजेच्या सुमारास वरणगाव रीक्षा स्टॉपजवळून कल्याण मटका जुगार खेळतांना ताब्यात घेण्यात आले. एक हजार दहा रूपये जप्त करण्यात आले. पोलीस कर्मचारी मेहरबान बाशीर तडवी व अहमद पठाण यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी करीत आहेत.