मुक्ताईनगर एसटी आगारामध्ये दोन महिलांनी घेतले एसटीचे स्टेअरिंग हाती 

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले दोघं महिलांचे स्वागत

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर येथे एस टी आगारात बदलीने नियुक्त तसेच मुक्ताईनगरच्या भूमीतील असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना चालक पदावर नियुक्ती देण्यात आली. राज्यातील विविध विभागात प्रथमच महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग आलेले असून आहे. मुक्ताईनगर येथे प्रथमच महिलांच्या हातात एस टी चे स्टेअरिंग आलेले आहे. या महिला कर्मचाऱ्यांची आज प्रथमच पदभार सांभाळल्या नंतर त्यांच्या हातात एस टी ची कमान देताना प्रसंगी एस टी महामंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान आ.चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रसंगी भेट देवून दोघे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व दोघे महिला कर्मचारी सुषमा बोदडे-शिरसाट व सुनीता पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आगारप्रमुख राजेश देशपांडे, एसटीचे कर्मचारी , शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य परिवहन सेवेची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून नियमित कर्मचारी भरती करण्यात आली. त्यात महिला कर्मचाऱ्यांना यापूर्वीच वाहक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. परंतु चालक म्हणून काम करण्याची संधी तब्बल 75 वर्षांनी महिला कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. एसटीच्या 2019 मध्ये झालेल्या सरळ सेवा भरतीसाठी जळगाव विभागात जागा होत्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या महिला उमेदवार सुषमा बोदडे-शिरसाट व सुनीता पाटील यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. यापूर्वी त्यांनी नियुक्ती नंतर जळगाव डेपो अंतर्गत कर्तव्य बजावलेले आहे.
मात्र मुक्ताईनगर येथे महिलांना चालक म्हणून नियुक्ती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्यातील विविध विभागात महिला कर्मचाऱ्याना अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.