मुक्ताईनगर एसटी आगाराला 52 लाख 56 हजाराचा नफा, आगार प्रमुख देशपांडे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

मुक्ताईनगर / प्रतिनिधी :…. राज्य परिवहन विभागाच्या मुक्ताईनगर आगाराने जुलै महिन्यात तब्बल १११ कोटी उत्पन्न वाढ मिळवत ५२ लाख ५६ हजार रुपये नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे आगारात एसटी बसेस चा तुटवड्या वर मात करीत सवलतीच्या प्रवाश्यांवर लक्ष केंद्रित करून बस फेऱ्या आखून हा नफा मिळविला असल्याचे आगार प्रमुख राजेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आगार प्रमुख यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वाहतूक नियंत्रक अनिल बावस्कर, जे ई वाघमारे, लिपिक जयकर, सिद्धार्थ भालेराव उपस्थित होते.

 

 

कोरोना काळात एसटी महामंडळा ला प्रचंड फटका बसला हळू हळू यातून मार्ग काढत एसटी चा आर्थिक ताळमेळ अलीकडे रुळावर येत आहे. मुक्ताईनगर आगार विदर्भ आणि खानदेश चा सीमावर्ती भाग यात विदर्भाच्या लांब पल्याच्या बसेस च्या अधिक फेऱ्या येथून जात असल्याने येथील अगराला प्रवाशी भार तोकडा पडतो. अशात येथील आगार व्यवस्थापक राजेश देशपांडे यांनी या वर मात करीत सवलतीच्या प्रवाश्यांवर लक्ष केंद्रित करून आगारातील बस फेऱ्यांची पुनर्रचना करून अगराला नफ्यात आणले आहे.

 

देशपांडे यांनी आठवड्यातील पाच दिवस शालेय विदयार्थी व महिला सन्मान योजनेवर भर दिली तर शनिवार रविवार महिला सन्मान योजना अमृत जेष्ठ नागरिक योजना वर लक्ष केंद्रित करून पंढरपूर व लांब पल्याच्या फेऱ्या करून आगाराच्या उत्पन्नात जुलै महिन्यात तब्बल ५२ लाख रुपये उत्पन्न वाढ केली आहे कोरोना पूर्व जुलै २०१९ मध्ये अगराने पावणे पाच लाखाचे उत्पन्न वाढ केली होती तद्नंतर या वर्षी तब्बल ५२ लाख ४६ हजारांची उत्पन्न वाढ मिळाली आहे.

 

@@@– आगारात बसेस ची कमतरता…

अगराला सध्या स्थितीत फक्त ४५ बसेस आहेत या पैकी ४२ बसेस फेऱ्यां वर पाठविल्या जातात. शालेय फेऱ्या आणि नियमित फेऱ्यां साठी किमान आणखी १० बसेस ची आवश्यकता आहे.

 

@@…१५ इलेक्ट्रिक बसेस मिळणार..

अगराची २० इलेक्ट्रिक बसेस ची मागणी केली होती त्या पैकी १५ बसेस मिळणार आहेत. या करिता आगारात एक कोटी रुपये खर्चातून चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

 

@@ इतर आगारातील बसेस मुळे आपल्या अगराला सामान्य प्रवाशी भार कमी मिळतोय. यामुळे सवलतीच्या प्रवाश्यां वर लक्ष केंद्रित करून नियोजन केले. त्या मुळे उत्पन्न वाढ मिळाली मागणी नुसार पंढरपूर फेऱ्या सोडल्याचा फायदा झाला

– राजेश देशपांडे

आगार व्यवस्थापक मुक्ताईनगर आगार.