मुक्ताईनगर तहसील कार्यालय मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली आढावा बैठक, पैशाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाकडून पकडून द्या आमदारांनी केल्या बैठकीत सूचना.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..वादळी पाऊस व अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या नुकसानी बाबत व पुरवठा विभागातील धान्य वितरण तसेच पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांना लाभ याबाबत महसूल व कृषी विभागाची संयुक्त आढावा बैठक तसेच दुपारी चार वाजता ग्राम विकास विभाग अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजांचा आढावा नऊ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत आमदारांनी एमआरजीएस योजनेतील घरकुला संदर्भात पैशाची मागणी करणाऱ्यांवर लाच लुचपत विभागात मार्फत कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

 

बैठकीमध्ये प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील निवासी नायब तहसीलदार डॉक्टर निकेतन वाळे, गट विकास अधिकारी निशा जाधव विस्तार अधिकारी वाय आर अढागडे , संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख यांचे सह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तलाठी नागरिक उपस्थित होते.

 

 

 

बैठकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी पीएम किसान योजनेविषयी महसूलची यंत्रणा काम करीत आहे का कोणी पैसे मागत आहे का तसेच पीएम किसान योजनेचा सर्वेक्षण करावे, शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले तसेच राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तालुक्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेचा लाभ तसेच स्वस्त धान्य दुकानदारांविषयीच्या मोठ्या तक्रारी तसेच भ्रष्टाचार होत असल्याचे आमदार पाटील यांनी बैठकीत सांगितले. मुक्ताईनगर येथील स्वस्त धान्य दुकान गोडाऊन मध्ये शिपाई नसल्याने राम बोरसे काम तसेच या ठिकाणी अनागोंदी कारभार व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदारांनी केला. दक्षता समित्या केवळ कागदावरच असल्याच्या तक्रार ग्रामस्थांकडून बैठकीत करण्यात आल्या. इंदिरा गांधी अपंग पेन्शन योजनेचे जवळपास 70 लाभार्थी वंचित असल्याचे बैठकीत महेंद्र मोडाळे कोळी यांनी सांगितले.

तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील तलाठी नाईक यांनी फेरफार नोंद करण्यासाठी दहा हजार रुपये घेतल्याचे एका शेतकऱ्याने बैठकीत सांगितले तलाठी नाईक यांना समोर बोलावत आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसावले. तसेच यापुढे पैशाची मागणी करीत असाल तर लाच लुचपत विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे आमदारांनी सांगितले.

 

निवासी नायब तहसीलदार डॉक्टर निकेतन वाळे यांनी तालुक्यामध्ये पीएम किसान योजनेचे 24 हजार 680 लाभार्थी असून यापैकी जवळपास 3000 लाभार्थ्यांचे कोड चुकीचे आहे. एक फेब्रुवारी 2019 आधीच्या जमिनी घेतलेल्या असलेल्यांना याचा फायदा मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबर बँक अकाउंटला जोडणी करून घ्यावी यासाठी ई केवायसी आवश्यक आहे.

तालुक्यातील घोडसगाव कुरहा अंतुरली मुक्ताईनगर या चार महसूल मंडळात 10 ऑगस्ट रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे वाळे यांनी सांगितले.

 

दुपारच्या बैठकीमध्ये तलाठी ग्रामसेवक यांच्या असंख्य तक्रारी बैठकीमध्ये आल्याने आमदार पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर घेतले.

ऑनलाइन घरकुल करण्यासाठी जिओ टग करणारे कर्मचारी दहा हजाराची मागणी करीत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी बैठकीमध्ये केली. तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे ग्रामसेवक तसेच सुळे रिगाव येथेही ग्रामसेवक नसल्याने विविध योजनांपासून लाभार्थी वंचित राहत असल्याची तक्रार सभेमध्ये ग्रामस्थांनी केली. आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळत नसल्याचेही लाभार्थ्यांनी सांगितल्यावर आमदार पाटील यांनी तहसीलदारांना सूचना करून दाखले तरी द्यावे अशी सूचना केली.

तालुक्यामध्ये 24 ग्रामसेवक असताना तीन ग्रामसेवक पंचायत समितीमध्ये रजा राखीव या कारणाने ठेवण्यात आलेले आहे यावर विस्तार अधिकारी आढागळे यांनी त्या ग्रामसेवकांना तालुक्यात सरपंच घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार सांगितला. या दोन विषयांवर पत्रकार मोहन मेढे यांनी गटविकास अधिकारी यांना प्रश्न विचारला असता सुळे रिगाव येथील ग्रामसेवकाची विभागीय चौकशी केली जाईल तसेच पंचायत समितीमध्ये असलेले तिघं ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीमध्ये नेमणूक केली जाईल असे सांगितले.

ग्रामसभा झाल्यानंतर त्याच दिवशी प्रोसिडिंग लिहिले पाहिजे अशा सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांना दिल्या.

@@ओबीसी बांधवांसाठी मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल मिळणार असून यासाठी घरकुल ऑनलाईन करण्याची गरज नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. योग्य लाभार्थ्याला याचा लाभ मिळावा तसेच कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

@@@–गेल्या आठ वर्षापासून मुक्ताईनगर शहरातील बहुउद्देशीय व्यापारी संकुल अपूर्ण अवस्थेत आहे. याविषयी मुक्ताईनगर येथील संजय कांडेलकर यांनी बैठकीमध्ये या व्यापारी संकुलासाठी ग्रामपंचायत असताना 50 लाखाचे कर्ज जिल्हा परिषदेकडून घेतले होते आता त्यावर 22 लाख रुपयांचे व्याज झालेले आहे असे एकूण 72 लाख रुपये जिल्हा परिषदेला देणे आहे असे सांगून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाय आर अढागळे यांनी जिल्हास्तरावरून कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले.

@@ग्रामसेविकेला खडसावले… बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय सुरू असताना एक ग्रामसेविका भ्रमणधणीवर बोलताना आमदारांना दिसली असता आमदारांनी त्या ग्रामसेविकेला तुम्हाला काम असेल तर बाहेर जाऊन बोला असे खडसावले.