मुक्ताईनगर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जे.ई. स्कुल व ज्युनियर काॅलेजचा मुलिंचा संघ विजयी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…………….…मुक्ताईनगर तालुकास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा एकनाथराव खडसे टॅलेन्ट स्कुलच्या मैदानावर पार पडल्या.यात तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्धाटन दूध संघाच्या माजी अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते झाले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील , तालुका क्रीडा समन्वयक संजीव वाढे,तालुका क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी ज्ञानदेव येवले,किरण भंगाळे, उपस्थित होते.

मुलिंचा अंतिम सामना शिवाजी हायस्कुल कुर्‍हा व जे.ई. स्कुल मुक्ताईनगर यांच्यात चुरशिचा अंतिम सामना झाला. यात जे.ई. स्कुल व ज्यु. काॅलेजचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघात प्राजक्ता भालशंकर, अश्र्विनी कोळी,करुणा चव्हाण,प्रगती दांंडगे,वैष्णवी खोंदले,दिपाली पाटील,वैष्णवी सांगळकर,आकांक्षा सोनोने,साधना बोदडे,रोशनी सपकाळे,वैष्णवी पाटील यांचा समावेश आहे..

..विजयी संघाचे मा. आ. एकनाथराव खडसे,संस्थेच्या अध्यक्षा रोहीणीताई खडसे—खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी,सचिव डाॅ.सी. एस. चौधरी,पुरुषोत्तम महाजन,प्राचार्य आर.पी. पाटील,उपप्राचार्य जे.जे. पाटील,पर्यवेक्षक विलास बर्‍हाटे, शरद महाजन,संतोष राठोड,यांनी अभिनंदन केले.व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. विजयी संघास संजीव वाढे, मनोज चौधरी, सुरेश मोरे , सचिन भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.