मुक्ताईनगर तालुका टीडीएफ कार्यकारिणी जाहीर

0

मुक्ताईनगर । टी.डी.एफ. तालुका कार्यकारिणीच्या निवड समितीची सभा जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगावचे अध्यक्ष एस.डी.भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रास्ताविक नवनियुक्त टी.डी.एफ.चे तालुकाध्यक्ष एस.एम.उज्जैनकर यांनी केले तर सुत्रसंचालन तालुका काँग्रेसचे सरचिटणीस तथा शिक्षक सुभाष पाटील यांनी केले. यावेळी एस.डी.भिरुड यांनी टी.डी.एफ.विषयी आणि सध्याची शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अनागोंदी कारभाराविषयी आपले परखड मत व्यक्त करत संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यकारिणीत यांचा समावेश
तालुका कार्यकारिणीत टी.डी.एफ. तालुकाध्यक्ष एस.एम.उज्जैनकर (पारंबी), अध्यक्ष उपाध्यक्ष एन.बी.गायकवाड (उचंदा) उपाध्यक्ष सी.जे.पाटील (चांगदेव) कार्याध्यक्ष गजानन भारुडकर (घोडसगाव), कोषाध्यक्ष चंद्रमणी इंगळे (अंतुर्ली), कार्यवाहक यु.आर.पाटील (कुर्‍हा), सहकार्यवाहक संजय वाडिले (कर्की), महिला प्रतिनिधी संगीता वासुदेव निळे (उचंदा), प्रसिध्दीप्रमुख विनायक वाडेकर (इच्छापूर), सभासद – एस.आर.राणे, एस.जे.उगले, एस.एस.तायडे (वडोदा), महिला प्रतिनिधी एस.एच.भोई, ए.एस.गावंडे, के.आर.जाधव, पी.जी.चौधरी (कुर्‍हा शिवाजी), पी.एम.घोगरे, पी.आर.भोई, गजानन गलवाडे (कुर्‍हा फडके), जी.एम.पवार (इच्छापूर), शरद बोदडे (सुकळी), एफ.आर.पाटील, एस.आर.मोरेस्कर (हरताळा), एल.बी.बेलदार (चांगदेव), डी.जे.गुळवे (अंतुर्ली), सलीम बाळू तडवी (पिंप्रीनांदू), जे.जे.पाटील, हेमंत बाऊस्कर (जे.ई.स्कुल, मुक्ताईनगर), शे. शकील शे. अजीज (अलफलाल उर्दू), व्ही.डी.तायडे (निमखेडी), पी.एच.खडसे (संत मुक्ताबाई माध्यमिक) आदींचा समावेश आहे.