मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

0
काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
मुक्ताईनगर । 2018 मध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, ज्वारी, मका, सोयाबीन हे लागवडीखालील क्षेत्र असून हंगामात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्यामुळे उन्हामुळे पिके करपली असून शेतकरी चिंतेत असल्याने मुक्ताईनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले.
गेल्या चार वर्षात शासनातर्फे कोणतीही कर्जमाफी अथवा भरीव मदत शासन स्तरावर शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने  दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीसया प्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर जगदीश पाटील ,तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव,  अरविंद गोसावी ,जिल्हा सचिव आसिफ खान,बी डी गवई ,युवक अध्यक्ष नीरज बोराखडे , प्रा सुभाष पाटील, प्रा पवन खुरपडे, विशाल बोदडे, अनिल सोनवणे, महेंद्र उमाळे, बाबू भोसले, सुगंधाबाई भोसले, मीराबाई पाटील, सलमा बी शेख, वसंत वानखेडे, संध्या हिरोळे ,अशोक घुले, संतोष पाटील, महेश खुडे व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते