मुक्ताईनगर तालुक्यातील अंतूर्ली फाट्याजवळ अवैधरित्या झन्नामन्ना खेळताना आठ जुगारींवर मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून तालुक्यातील अंतूर्ली ते अंतूरली कडे जाणाऱ्या रोडने राज ढाब्याच्या पाठीमागे शेतात केळीच्या बागेत अंतुर्ली शिवारात दहा सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता पोलिसांनी अवैधरित्या झन्ना मुन्ना जुगार खेळताना आठ जुगारींना सापळा रचून पकडले. अंगझळतील जुगारींकडून पोलिसांना 23330 रुपये मिळाले. पोलीस कॉन्स्टेबल राजेश महाजन यांचे फिर्यादीवरून असलम खान नवाब खान

, पंकज राजू बोराडे, अतुल रमेश कोसोदे

, अत्तर खान सदर खान, शोएब खान नसीर खान

, दिवाकर फकीरा पवार

, योगेश बंडू सपकाळे वरील सर्व राहणार अंतुरली तालुका मुक्ताईनगर व

शफिक अख्तर अब्दुल रौफ बऱ्हाणपूर ता. जिल्हा बऱ्हाणपूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे , पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांचे उपस्थितीमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव, लतीफ तडवी ,देवसिंग तायडे, रवींद्र चौधरी, मंगल साळुंखे ,विशाल कोळी , चेतन गवते या पथकाने केली.