Big relief for farmers in Muktainagar taluk: Subsoil sample no. 8 will come on the passage of A मुक्ताईनगर : गाव नमुना नं. 7/12 मधील वर्ग अ पोटखराब क्षेत्र बहुतांश शेतकर्यांनी सुधारणा करीत करुन लागवडीखाली आणले असतानाही ही शेतजमीन उतार्यावर लागवडी योग्य नोंद होण्यासाठी शासन निर्णयानुसार दखल घेण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी 29 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केली होती. या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकार्यांनी आदेश काढल्यानंतर मुक्ताईनगर तहसीलदारांनी तालुक्यातील महसुली मंडळे व सजे या ठिकाणी तारखे नुसार तक्ता जाहीर कॅम्प लावून अंबलबजावणी करण्याचे तलाठी व महसूल मंडळ अधिकार्यांना आदेश दिले आहेत.
शासकीय योजनांचा लाभ घेताना मिळणार दिलासा
दरम्यान, शासनाने पोट खराब वर्ग ‘अ’ च्या सर्व जमिनी लागवडयोग्य ठरविल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीचा मोबदला, भूसंपादन मोबदला, खरेदी-विक्रीतील मोबदला इ. तसेच शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा शेतकर्यांना लाभ मिळेल.
- मुक्ताईनगर तालुक्यात या तारखेला होणार कॅम्प
15 सप्टेंबर 2022 :- कोथळी, चांगदेव, चिंचोल, निमखेडी खुर्द, हरताळे, पातोंडी, बेलसवाडी, पूर्णाड, उचंदे, कर्की, पिंप्राळा, कोठा, काकोडा, चिंचखेडा खुर्द, मन्यारखेडे ,सुकळी, चारठाणा
22 सप्टेंबर 2022 :- सालबर्डी, चांगदेव, मेहुण, ढोरमाळ, हरताळे, नरवेल, पिंप्रीनांदू, धाबे व मेंढोदे, खामखेडे, नायगाव, कुर्हा, भोटा, काकोडा, चिंचखेडे खुर्द, सातोड, भांडगुरे, दुई, मोरझिरा
29 सप्टेंबर 2022 :- मुक्ताईनगर, मानेगाव, वढवे, सारोळा, हरताळे, अंतुर्ली, धामणदे, शेमळदे, पंचाणे, रामगड व कोठे, थेरोळा, रीगाव, बोरखेडा, धुळे, कुंड तरोडा, डोलारखेडा,मधापुरी.
6 ऑक्टोंबर 2022 :- मुक्ताईनगर, मानेगाव, कासारखेडा, माळेगाव, हरताळे, अंतुर्ली, बेलखेडे, पिंप्रीपंचम, मेळसांगवे, लोहारखेडा, पारंबी, कोर्हाळा, राजुरे, धुळे, घोडसगाव, चिखली, नांदवेल, धामणगाव.
13 ऑक्टोंबर 2022 :- मुक्ताईनगर, अंतुर्ली, भोकरी, मोंढोळदे, पिंप्री भोजना, उमरे, वढोदा, निमखेडी बुद्रुक, घोडसगाव, रुईखेडे, चिचखेडा बुद्रुक.
20 ऑक्टोंबर 2022 :- हिवरे, हलखेडा, निमखेडी बुद्रुक, घोडासगाव , वायला.
27 ऑक्टोंबर 2022 :- तालखेडा, हलखेडा, बोदवड, टाकळी.
03 नोव्हेंबर 2022 :- जोंधनखेडा, इच्छापुर, महालखेडा