मुक्ताईनगर तालुक्यातील शासनाच्या सलोखा योजनेतंर्गत पहिला दस्ताची तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांच्या साक्षीने नोंद
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
शेतजमिनीचा ताबा व वहीवाटीबाबत शेतकऱ्यातील आपआपसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये
सलोखा निर्माण होऊन एकमेकामधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील
शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या
शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रुपये 1हजार व
नोंदणी फी नाममात्र रुपये 1 हजार आकारण्याबाबत सवलत देण्याची “सलोखा योजना” राबवण्यास शासनाने 3 जानेवारी 2023 रोजी मान्यता दिली.
या योजनेनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला दस्त तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांच्या प्रयत्नाने नोंदविला गेला.विशेष बाब म्हणजे त्यांनी दस्तावर स्वतः साक्षीदार म्हणून सही करून या योजनेत इतर शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
मुक्ताईनगर तालुक्यातील उमरे गावातील गट नंबर 54/1 आणि 54/2 यातील शेतकरी अनिल पवार आणि गीताबाई पवार यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.