मुक्ताईनगर : मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे अंतुर्ली, कुर्हा, उचंदा व घोडसगाव हद्दीत अवैधरीत्या दारू तयार करणार्या चार विक्रेत्यांच्या अवैध दारू भट्टीवर पोलिसांनी छापा टाकत 45 हजार रुपये किंमतीचे 675 लीटर कच्चे पक्के रसायन, 70 लीटर गूळ-मोह नवसागर मिश्रीत रसायन व 25 लीटर तयार दारू जागीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी चार विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपनिरीक्षक परवीन तडवी, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार संतोष चौधरी, हवालदार गणेश मनुरे, हवालदार संजय पाटील, अशोक जाधव, नाईक संतोष नागरे, गजमल पाटील, अविनाश पाटील, मोतीलाल बोरसे, कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, हेमंत महाजन, संजय लाटे, राहुल नावकर, सागर सावे, राहुल बेहेनवाल, अभिमान पाटील, राहुल महाजन, रवी चौधरी, माधव गोरेवार, मंगल साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.