Raid on Poorna Kath in Muktainagar taluka while traveling by boat: State Excise Department destroys village liquor worth three lakhs भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रानजीक अवैधरीत्या दारू भट्ट्यांद्वारे मानवी आरोग्याला घातक अशी गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळातील पथकाला मिळाल्यानंतर पथकाने जळगाव गुन्हे शाखेची मदत घेत छापेमारी करीत दोन लाख 62 हजार पाचशे रुपये गावठी दारूचे घातक रसायन नष्ट केले. शनिवार, 8 रोजी सकाळी झालेल्या कारवाईने अवैधरीत्या दारू तस्करी करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पथकाला पाहताच अवैध दारू तस्करांनी धूम ठोकली. पथकाने कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळत खाजगी बोटीतून प्रवास करीत मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र चांगदेव येथून बोटीद्वारे मानेगाव, उचंदा व मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे.
गावठी दारू तस्करांमध्ये खळबळ
पूर्णा नदीच्या पात्रानजीकच्या बेटांमध्ये अवैधरीत्या गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेची मदत घेत शनिवार, 8 रोजी विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने श्री क्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीद्वारे मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव, उचंदा व मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकून अवैध दारू भट्ट्या नष्ट केल्या तसेच दोन लाख 62 हजार पाचशे रुपये किंमतीचे 11 हजार 960 रसायन जागीच नष्ट केले तर पथक येण्याचा सुगावा लागल्याने अवैध दारू तस्कर मात्र पसार झाले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त सकांतीलाल उमाप, साहेब, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जळगाव पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे, जळगाव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, पूर्णा फाटा सीमा तपासणी नाका दुय्यम निरीक्षक अमोद भडागे, विभागीय निरीक्षकांच्या पथकातील वाहन चालक सागर देशमुख, गोकुळ अहिरे, मधुकर वाघ, नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, भूषण परदेशी, नंदु नन्नवरे, विजय परदेशी आदींसह गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी केली. तपास निरीक्षक सुजित कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक अमोद भडागे करीत आहेत.
कारवाईचा सपाटा सुरूच राहणार : सुजित कपाटे
2 ते 8 ऑक्टोंबर दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त गावठी हातभट्टी दारूचे समूट उच्चाटन केले जात आहे. भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगरसह बोदवड, यावल व रावेर तालुक्यात या
यापुढेदेखील अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणार्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे म्हणाले.