मुक्ताईनगर तालुक्यात चार जणांचा मृत्यू

0

भुसावळ। मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. एकाचा शॉक लागल्याने तर अन्य तिघांनी काहीतरी विषारी द्रव सेवन केल्याने मृत्यू झाला. मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर शिवारात इलेक्ट्रीक शॉक लागल्याने सुधाकर मधुकर गवते (27, खामखेडा) यांचा मृत्यू झाला. ही घटना 26 रोजी दुपारी 12.30 वाजेपूर्वी घडली. दुसर्‍या घटनेत 21 रोजी शामराव गणपत सुरवाडे (निमखेडी खुर्द) यांनी विषारी द्रवपदार्थ सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर 22 रोजी दिनकर मुरलीधर ठाकरे (पंचाने) यांचाही विषारी द्रव पदार्थ सेवन केल्याने मृत्यू झाला. चौथ्या घटनेत किशोर वना लोधी (मेळसांगवे) यांचा 22 रोजी मृत्यू झाला.