माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश
मुक्ताईनगर- माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत नागरीकांकडून मागणी केली जात असलीतरी जिल्हा परीषद अंतर्गत खर्चाच्या मर्यादेत अडचणी येत होत्या. याबाबत जिल्हा परीषद अंतर्गत रस्ता कामांसाठी निधीत वाढ करून मंजुरी देण्यात यावी यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रस्ते व पूल योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार आहे.
या रस्त्यांच्या कामांना मंजुरी
कर्की, बेलसवाडी, नरवेल, अंतुर्ली, पूर्णाड, पूर्णाड फाटा, खामखेडा, मुक्ताईनगर, सातोड, रुईखेडा, जिल्हा हद्द तिघ्रा, मुक्ताईनगर ते सातोड जुना रस्ता, अंतुर्ली ते इच्छापूर सतीचा बोळ रस्ता, रुईखेडा ते देवधाबा रस्ता, नायगाव ते धाबे रस्ता, कोथळी ते सालबर्डी रस्ता, भोटा ते पिंप्राळा रस्ता, रामा ते नांदवेल जोडरस्ता,
लोहारखेडा ते पिंप्रीपंचम रस्ता, प्ररामा क्रमांक पाच ते पिंप्रीभोजना रस्ता, पारंबी, काकोडा ते रामा 47 रस्ता, इच्छापूर चारठाणा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यासाठी सात कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे.