मुक्ताईनगर तालुक्यात विकासकामांचे भूमीपूजन

0

मुक्ताईनगर : खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामांना मंजूरी मिळाली असून मुक्ताईनगर, सालबर्डी, कोथळी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. वार्ड क्रमांक 2 मध्ये रस्ता काँक्रिटिकरण, पंचा टाकीचे लोकार्पण, वॉर्ड क्रमांक 5 मध्ये रास्ता काँक्रिटिकरण, वॉर्ड क्रमांक 3 व 4 मध्ये रस्ता काँक्रिटिकरण तर सालबर्डी येथे रस्ता काँक्रिटिकरण, कोथळी येथे म्हाळसादेवी मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन, आशापुरी देवी मंदीर सभागृह भूमिपूजन, राम मंदिर व हनुमान मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, सभापती राजू माळी, सरपंच ललित महाजन, योगेश कोलते, सतीश चौधरी, दत्त जोगी, बापू ससाणे, राहुल महाजन तर सलबर्डी येथे सरपंच तुषार राणे, रमेश खाचणे, प्रभाकर झोपे, तृप्ती राणे, सुवर्ण बर्‍हाटे, दिनकर बर्‍हाटे, सुरेश बढे, पंकज भारंबे, अमोल पाटील, आनंद बर्‍हाटे, कोथळी येथे सरपंच संजय चौधरी, नारायण चौधरी, पंकज चौधरी, प्रशांत जंगले, दीपक राणे, नितीन चौधरी, राजू कोळी, कादिर बागवान उपस्थित होते.