मुक्ताईनगर। तालुक्यातील हरताळे येथे विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. त्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत 18 रोजी सकाळच्या सुमारास साई गजानन नगरातील एका विवाहितेला भ्रमणध्वनी करुन सुरेश भालेराव व मुकेश वानखेडे व अन्य दोन अशा चौघांनी अश्लिल संभाषण करुन लज्जास्पद कृत्य केले.
त्यानंतर महिलेचा पती समजविण्यास गेला असता त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्यादी पिडीत महिलेने मुक्ताईनगर पोलीसात दाखल केली आहे. यावरु चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सादीक पटवे करीत आहे. तर दुसर्या घटनेत तालुक्यातील हरताळे येथे मुलांचे भांडण सोडवत असताना 40 वर्षीय विवाहितेचा कमलेश हरि भगत याने विनयभंग केल्याचे कारणावरुन पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमराज भावसार करीत आहे.