मुक्ताईनगर तालुक्यात विकासकामांसाठी दोन कोटी 35 लाखांचा निधी मंजूर

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व मूलभूत सुविधा योजने अंतर्गत तालुक्यातील रस्ते पथदिवे व विविध विकास कामांसाठी दोन कोटी 35 लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

या कामांना मंजुरी
इच्छापुर बेलदार तांडा रस्त्याचे काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, इच्छापुर वंजारी तांडा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण सौर पथदिवे लावणे, वढवे येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, बोरखेडा नवे-जुने येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, चिखली येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, मानेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, हरताळा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, चिंचोल येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, थेरोळा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, सातोड येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, टाकळी येथे रस्ता काँक्रीटीकरण व सौर पथदिवे लावणे, नायगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, लोहारखेडा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, सारोळा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, हिवरा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे, जोंधनखेडा येथे रस्ता काँक्रिटीकरण व सौर पथदिवे लावणे तसेच मूलभूत सुविधा योजनेंतर्गत मुक्ताईनगर शहरासाठी हायमास्ट लॅम्प बसविणे, कोथळी येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे, सारोळा येथे पाणीपुरवठा बसकी टाकी बांधणे, घोडसगाव शाळेस रंगमंच बांधकाम व हायमास्ट बसविणे, चिंचखेडा खुर्द येथे हायमास्ट लॅम्प बसविणे, रुईखेडा येथे विठ्ठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे, चांगदेव येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, मेळसांगवे हायमोस्ट लॅम्प बसविणे, मेहुण येथे अंतर्गत रस्त्यावर ब्लॉक बसविणे, पिंप्री अकाराउत येथे हायमास्ट लॅम्प बसवणेे, पूर्णाड येथे स्मशानभूमी बांधकाम करणे, माळेगाव येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, अंतुर्ली येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे व हायमास्ट लॅम्प बसविणे, महालखेडा येथे रंगमंच बांधकाम करणे, निमखेडी बुद्रुक येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बेलसवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, धुळे येथे हायमास्ट लॅम्प बसविणे, लालगोटा येथे हायमास्ट लॅम्प बसविणे, धामणगाव तांडा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, भोटा येथे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, थेरोळा येथे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामे होणार असून त्यासाठी दोन कोटी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.