मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

0

मुक्ताईनगर- तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पहिल्या घटनेत सीताराम राजाराम चौधरी (49, पिंप्रीपंचम) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 9 रोजी रात्री 11 वाजता चौधरी यांच्या छातीत दुखत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत सचिन भगवान चौधरी (प्रिंप्रीपंचम) यांनी खबर दिली. तपास सहाय्यक फौजदार माधवराव पाटील करीत आहेत. दुसर्‍या घटनेत वढोदा येथील संदीप समाधान हागे (32, वढोदा) यांनी 9 रोजी काहीतरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. रविवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मनोहर समाधान हागे (वढोदा) यांनी खबर दिली. तपास हवालदार सुधाकर शेजोळे करीत आहेत.