मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

मुक्ताईनगर : तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात नोंद करण्यात आली. एका घटनेत 38 वर्षीय इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला तर दुसर्‍या घटनेत सारोळ्यात 55 वर्षीय इसम घरात मयत स्थितीत आढळला.

वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू
तालुक्यातील खामखेडा शिवारातील लिंबाच्या झाडाला 38 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली. सुरेश त्र्यंबक पाटील असे मयताचे नाव आहे. खामखेडा पोलिस पाटील किरण वासुदेव गवते यांनी पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी ही घटना उघडकीस आली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहेत. दुसर्‍या घटनेत सारोळा येथे 55 वर्षीय व्यक्ती स्वतःच्या घरात मृत अवस्थेत आढळला. आला सदर घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. तारासिंग फुलसिंग पाटील (55) असे मयताचे नाव आहे. रवींद्र तारासिंग पाटील यांनी पोलिसात या प्रकरणी खबर दिली. तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.