मुक्ताईनगर तालुक्यात 63 टक्के मतदान

0

मतदारांच अपूर्व उत्साह ; बोहल्याआधी नवरदेवाने बजावला हक्क

मुक्ताईनगर- रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाचा वेग संथगतीने असलातरी नंतर मात्र मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.66 टक्के मतदान झाले तर नंतर हा आकडा सुमारे 63 टक्क्यांपुढे गेल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली तर मतदान केंद्रावर अधून-मधून मतदारांचया रांगा तर कधी निरव शांतता असे चित्र होते.

स्लीपअभावी मतदारांचा उडाला गोंधळ
मतदानाबाबत नवमतदारांमध्ये अपूर्व उत्साह होता. युवकांच्या तुलनेत युवतींना मतदानाचे प्रचंड आकर्षण दिसून आले. शहरात सकाळच्या दुसर्‍या टप्प्यात नवमतदार मतदान केंद्रावर गर्दी करून होते. ग्रामीण भागात सकाळी 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी गर्दी केली होती तर मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. नवीन मतदार, तरुण, वृद्धांची मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने गर्दी झाली तर शेतकरी-शेतमजूर मतदारांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी मतदार स्लीपच वाटप न झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. दुसरीकडे मतदान केंद्रांबद्दल माहिती नसल्याने या गोंधळात चांगलीच भर पडली .

अंतुर्ली केंद्रावर ईव्हीएममध्ये आल्या अडचणी
अंतुर्ली येथील केंद्रावर मतदान यंत्र जोडणीत तांत्रिक अडचणी आल्याने अंतुर्ली येथे अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. विधानसभा मतदारसंघात एकूण सात ठिकाणी व्हीव्हीपॉट, चार ठिकाणी ब्यालेट युनिट तर दोन ठिकाणी कंट्रोल युनिट बदलण्यात आले. . या घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विधानसभा मतदारसंघात सकाळी मॉक पोल नंतर प्रत्यक्ष सात वाजता मतदानास सुरवात झाली

माजी मंत्री खडसेंसह परीवाराचे कोथळीत मतदान
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथील मतदान केंद्रावर सकाळी 10 वाजता मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी महानंदाच्या चेअरमन मंदा खडसे, जेडीसीसी बँक चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर, शारदा चौधरी आदींची उपस्थिती होती.

आधी बजावला हक्क नंतर चढला बोहल्यावर
मुक्ताईनगर येथे प्रशांत गोपाळ सनांसे या मंगळवारी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. तसेच अंध मतदाराने सुध्दा आपले मतदानाचा हक्क बजावला.

सहा ठिकाणी आल्या तांत्रिक अडचणी
अंतुर्ली येथील केंद्रावर मतदान यंत्र जोडणीत तांत्रिक अडचणी आल्याने अंतुर्ली येथे अर्धा तास उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. विधानसभा मतदारसंघात कुर्‍हा, मनुर, मुक्ताईनगर, बोरखेडा, भानखेडा, बलवाडी येथील व्हीव्हीपॉट तर ठिकाणी ब्यालेट युनिट व दोन ठिकाणी कंट्रोल युनिट बदलण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.