मुक्ताईनगर तालुक्यात 14 गावांवर टंचाईचे सावट

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील 14 गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणासह आवश्यक उपाययोजनांचे प्रस्ताव गटविकास अधिकार्‍यांकडे सादर केले आहे. बीडीओंनी हे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले होते. यानुषंगाने 5 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

तापमान वाढल्याने विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावत असून तालुक्यातील 14 गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची चिन्हे असल्यानेे ग्रामपंचायतींनी बीडीओ आणि बीडीओंनी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार पाच गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. प्रिंपाळा, सुळे, राजुरा, धामणगाव, चिंचखेडे खुर्द, तालखेडा अशी ही गावे आहेत. याशिवाय धामणगाव तांडा, बोरखेडा जुने, वायला, सुळे, खामखेडा, कुंड, बोरखेडा नवे, रामगढ वस्ती, वढोदा, सुकळी, दुई, वडगाव, रिगाव, सुळे येथेही टंचाई जाणवत आहे.